Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिवकल्याण राजा

शिवकल्याण राजा





राजकारण उदंड दाटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नस्ता लिहिले । क्षमा केली पाहिजे ।।१५।।


                            समर्थ पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना पत्रात म्हणतात, तशी गरज नसतानाही आणि विवक्षित प्रसंग उद्भवला नसतानाही मी हे लिहीत आहे याबद्दल क्षमा करावी. मुत्सद्दीपणे राज्य राखणे,शत्रूला शौर्याने तोंड देणे, योजनापूर्वक राज्यवृद्धी करणे आणि उत्तम कल्याणकारी कारभार करणे अशी चतुरस्त्र कामे आपल्यामागे आहेत. साहजिकच आपले लक्ष अनेक अंगी विभागले जात असणार: म्हणून हे पत्र लिहीत असल्याचे नमूद करून रामदास स्वामी आपल्या पत्राची समाप्ती करतात.
 
                      समर्थ रामदासांचा जन्म १६०८ सालचा.जांब या मराठवाडय़ातील गावी बारा वर्षाचे बालपण व्यतीत झाल्यानंतर, नाशिकजवळच्या टाकळी येथे बारा वर्षांचे तपाचरण व त्यानंतर बारा वर्षांचे भारतभ्रमण करुन ते १६४४ च्या सुमारास स्वराज्यात आले. समर्थसंप्रदायाचा पहिला मठ त्यांनी चाफळ येथे स्थापन केला.परकीय टाचेखाली पिचलेली जनता त्यांनी आधीच्या छत्तीस वर्षात पाहिली होती.अशा अवघड परिस्थितीत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून केलेला अफाट प्रयत्न आणि त्यातून उभा केलेला स्वराज्याचा लढा समर्थांनी अवलोकन केला होता.त्यांचे अतुलनीय धैर्य व पराक्रम पाहून समर्थ स्तिमित झाले होते. शिवाय  *'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा'* अशा निर्मम,निर्लोभी वृत्तीने ते स्वराज्याचा कारभार चालवीत होते.त्याबद्दल समर्थांना शिवरायांचे आदरमिश्रित कौतुक वाटत होते. त्या सर्व सद्भावना आणि सद्गुणांपोटी असलेला परमादर शब्दबद्ध करून पुढील कार्यासाठी शुभकामना व्यक्त करणे हाच समर्थांचा उद्देश पत्र लिहिण्यामागे असावा.
                                  या पत्राचे वाचन आणि मनन करून आजही त्यातील आशय प्रत्येकाने समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारताला जगात अग्रस्थानी नेण्यासाठी या सद्गुणांचे स्मरण करणे प्रेरणादायी ठरेल. सुमारे चारशे वर्षांनंतरही एका पराक्रमी कल्याणकारी राजाची स्तुती एक निःस्संग रामदासी गोसावी ज्या उच्चतम भावनेतून करत आहे ती भावना कोणत्याही काळात प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने समजून घेण्यासारखी आहे.

🙏🏻🚩 * जय जय रघुवीर समर्थ* 🚩🙏🏻

*संकलन:-ह.म.प.हिंदुरावमहाराज गोळे.*
*सातारा जिल्हा सत्संगप्रमुख ,विश्व हिंदू परिषद,बजरंग दल.*
*सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

Post a Comment

0 Comments