Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शंभूराजे

शंभूराजे

लेखनीच्या आणि तलवारीच्या जोरावर
शंभूराजांनी राज्य केलं मराठी हृदयावर

कोवळ्या वयात ओलीस राहिले मिर्झाकडं
शंभूबाळाच्या वर्तनान मिर्झालाही पडलं कोडं

आगऱ्याला गेले औरंग्याच्या भेटीला
शिवरायांचा रौद्र अवतार त्यांनी पाहिला

गुजरात खंबायतावर स्वारी करुन 
भगवा फडकविला मोठ्या डौलानं

धर्मासाठी शंभूराजांनी प्राण अर्पिले 
धर्मवीर शंभूराजे मृत्यूंजय ठरले

शंभूराजांची गाथा बलिदानाची आणि शौर्याची
कलियुगी ठरला हा जणू दुसरा दधिची

धन्य धन्य शंभूराजे धर्मवीर थोर
कवी मनाचा असा  कलमबहाद्दर

सळसळत्या रक्ताचा जणू अंगार
रुद्राचा हा अवतार मुजरा तुम्हा वारंवार

© ✍🏻  हिंदुराव गोळे

    या आधीच्या कविता, पोवाडे व लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला दिलेल्या लिंकवर अवश्य भेट द्या.



Post a Comment

0 Comments