शिवतेज
शिवनेरीवर जन्म झाला शिवरायांचा
अवतार नरसिंह रुपातील कालीचा
बारा मावळचे सवंगडी करुन गोळा
सह्याद्रीच्या खोऱ्यात मांडला स्वराज्य सोहळा
स्वराज्याचे तोरण बांधून तोरण्यावर
प्रहार केला एकजूटीने जुलूमी सत्तेवर
शाहिस्त्याची करुन फजिती
शिवतेजाची दाखवली प्रचिती
अफझल्याला प्रतापगडावर फाडला
दहशतवाद शिवप्रतापाने असा गाडला
रायगडी झाला राज्याभिषेक सोहळा
हर एक मावळा झाला होता गोळा
जन्मले शिवराय असे न भूतो न भविष्यती
चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत राहील त्यांची कीर्ती
© ✍🏻 हिंदुराव गोळे
कविता, पोवाडे, लेख आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments