सोडून द्या
सोडून सगळा व्यर्थ अहंकार
नात्यांमधील मिटवावा अंधकार
सोडून फुकाचा गर्व आणि ताठा
हृदयांत असावा प्रेमाचा साठा
सोडून द्यावा एकमेकांमधील अबोला
नेहमी एकमेकांशी प्रेमाने बोला
सोडून सारा फुकाचा अभिमान
जपावा नात्यांतील मान सन्मान
सोडून द्यावा उगाचचा हाव
असायला हवा नात्यांत आदरभाव
सोडून द्यावा इतरांचा करणे मत्सर
अडीअडचणीत मदतीला असावे तत्पर
सोडून द्यावे आपसातील हेवेदावे
जिव्साळ्याने नेहमी नाते जपावे
सोडून द्यावे रागाचे बोलणे
प्रेमाने अवघे जग जिंकणे
सोडून सारा नात्यातील दुरावा
एकमेकांतील प्रेमाचा जपावा ओलावा
सोडून गेल्यावर आपण हे जग
आठवणीत राहू साऱ्यांच्या मग
© ✍🏻 हिंदुराव गोळे
कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी कृपया आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

1 Comments
खूप सुंदर
ReplyDelete