Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आरती शिवप्रभूंची

आरती शिवप्रभूंची

जय देव जय देव जय जय शिवछत्रपती भगवंता
तुमचे गुण वर्णाया द्यावी मज स्फूर्ती आता
जय देव जय देव  ।। धृ ।।

शंभू महादेवाला तुम्ही रक्ताभिषेक केला
स्वराज्य निर्मितीचा अवघड डाव मांडिला
स्थापूनी हिंदवी स्वराज्य प्रण पूर्ण केला
पराक्रम गाजवूनी इतिहास घडविला  - १
जय देव जय देव जय जय शिवछत्रपती ....

हर हर महादेव वीर गर्जना केली
माता तुळजाभवानी प्रसन्न झाली
बारा मावळ कोकणच्या त्या चौदा ताली
भगव्या झेंड्याखाली एकत्र आली  -२
जय देव जय देव जय जय शिवछत्रपती...

नरसिंह रुपातील कालीचा तुम्ही अवतार
धर्म संस्थापण्या केले युद्ध घनघोर
रामराज्याचा झाला हो साक्षात्कार
कलीयुगी जन्मले तुम्ही नरवीर -३
जय देव जय देव जय जय शिवछत्रपती....

भक्ती शक्ती युक्तीचा संगम तुमचे अंगी
यशवंत कीर्तीवंत तुम्ही श्रीमंत योगी
कीर्तीचा तुमच्या सुगंध दरवळला जगी
निजरुप दाखवा तुमचे मज अंतरंगी - ४
जय देव जय देव जय जय शिवछत्रपती....

दुष्ट दुर्जनांना तुम्ही हो संहारी
नित्य निवास तुमचा रायगडी मंदिरी
नतमस्तक झालो मी तुमच्या चरणावरी
आशिर्वाद द्यावया प्रभू आता यावे झडकरी -५
जय देव जय देव जय जय शिवछत्रपती भगवंता
तुमचे गुण वर्णाया द्यावी मज स्फूर्ती आता
जय देव जय देव

।। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ।।

© ✍🏻 हिंदुराव गोळे
कृपया माझ्या नावासह पोस्ट शेअर करा ही विनंती.
     माझ्या कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
 

 

Post a Comment

0 Comments