युगंधर
सुदर्शन चक्रासारखं असून शस्त्र
बासूरीचं केलेस अस्त्र
शिशूपालास होतास सक्षम वधण्यास
वाट पाहिलीस शंभर अपराध करण्यास
सामर्थ्याचा होतास पुरंदर खास
सारथी झालास अर्जुनाच्या रथास
सोडलीस गोकुळ नगरी नंद यशोदा मातेस
विरहाने न हतबल झालास
सकळ ब्रम्हांडाचा असून नायक जरी
द्रौपदीच्या चिंधीसाठी वस्त्र पुरविलेस तरी
पांडवांचा बनून कैवारी
झालास तयांचा तारणहारी
विदुरा घरी कण्या भक्षिल्या प्रेमाने
पोहे खाल्ले सुदामदेवाचे आवडीने
प्रेमाची सदैव भूक तुला
आनंद कंद रे नंदलाला
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
☝🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments