Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

तुझं असणं

तुझं असणं 

शब्द माझे जणू मुके होतात
जेव्हा तुझे बोल कानी पडतात 

तुझ्या गालावरची खळी बघून 
गुलाबही जणू जातात हरवून 

तुझ्या डोळ्यांतील भाव बघून 
हरणीही जाते लाजून 

तुझा रेशमी केशसंभार बघून 
नकळत बोटे फिरतात जपून 

तुझ्या डोळ्यांतील अश्रू बघून 
काळजातील घागर जाते भरुन 

तुझं ते मोहक हसणं बघून 
चांदण्याही जातात लाजून 

तुझ्या सहवासात जातो रमून 
हवाहवासा वाटतो तो अजून 

हरवते मला ते तुझं असणं 
आयुष्य होतं गोड गाणं 

✍🏻 हिंदुराव गोळे 

🌸🌸🌸🌸🌸

https://hinduraogole.blogspot.com/
 ☝🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. 🙏🏻

Post a Comment

0 Comments