मित्र असावा असा
असा एक मित्र असावा,
न सांगता भाव कळावा...
मैत्रीत दिल्या-घेतल्याचा हिशोब नसावा,
स्वार्थाचा मैत्रीत लवलेशही नसावा.
स्वतःचे दुःख विसरून मित्रासाठी हसावा,
असाच एक मित्र मैत्रीसाठी निवडावा.
धागा मैत्रीचा हळुवार जपावा,
जगाला साऱ्या हेवा वाटावा.
आपल्या यशाने तो मनापासून आनंदी व्हावा,
त्याच्या सुख-दुःखासाठी डोळ्यात ओलावा.
मैत्रीचा हात कधीच न सुटावा,
जपलेला ऋणानुबंध कधीही न तुटावा.
नुसता गर्दीचा नकोच तो थवा,
मैत्रीत जीव ओवाळून टाकणारा हवा.
असा एकच मित्र प्रत्येकाला असावा,
आईलाही तो आपला मुलगा वाटावा.
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
☝🏻आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments