तो एक क्षण पुरेसा,
जो वाटे हवा हवासा...
चेहरा तुझा समोर असा,
एकटक पाहत राहावासा...
सोज्वळ, भावुक, गोड कसा,
केवड्याचा सडा पडला जसा...
आता झाला तो धूसरसा,
ढगाआड हरवला चंद्र जसा...
विसर पडला आता काहीसा,
जीव होतो पाहण्या वेडापिसा...
तो एक क्षण वाटे हवा हवासा,
येईल का तो पुन्हा नव्याने जसा?
तो एक क्षण पुरेसा,
जगून घेईन मी खासा...
आता नाही कसला भरवसा,
आठवतो तो चेहरा रात्रंदिवसा...
चांदण्यात हरवला चंद्र जसा,
पडला घरात माझ्या कवडसा...
तो एक क्षण आता पुरेसा,
तडफतो मी जला विना मासा...
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments