Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आगमन गणरायाचे

॥ श्री गणेशाय नमः ॥
🙏🏻🌺 गणरायाच्या आगमनाची तयारी 🌺🙏🏻

तयारी सुरू आहे बाप्पाच्या आगमनाची,
उद्या स्वारी येईल लाडक्या गणरायाची।

सुख-समृद्धी, निरामय आरोग्याची,
कृपा अशी राहो त्या विघ्नहर्त्याची।

आनंदाची, उत्साहाची आहे लाट,
बाप्पा विराजमान होई मोठ्या थाटात।

वर्षभर पाहतात सगळेच त्याची वाट,
गणपतीला बसायला सजतो चांदीचा पाट।

मोदक, लाडू, फुटाण्यांचा प्रसाद,
सगळ्यांवर राहो विनायकाचा आशीर्वाद।

टाळ-मृदंगाच्या गजरात होई आरती,
गणराय करेल सर्वांच्या मनोकामना पूर्ती।

✍🏻 हिंदुराव गोळे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🙏🏻

Post a Comment

0 Comments