Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

माझा राजा

🚩🌺 माझा राजा 🌺🚩

तेहतीस कोटी देवांच्याही आधी करीन तुमची पूजा,
हृदयमंदिरी वसतो माझ्या, माझा राजा...!

करुनी पराक्रम रक्षिले देव, देश आणि धर्माला,
मुजरा आमचा तुमच्या अतुलनीय शौर्याला...!

प्रजादक्ष, न्यायी राजा नाही जगती दुजा,
रायगडी होता असा अमुचा श्री शिवाजी राजा...!

अबलांच्या शीलाचं, शेतकऱ्यांच्या कष्टांचं करुनी रक्षण,
उपसूनी तलवार, यवनासुरांचं केले तुम्ही मर्दन...!

सौभाग्याचे अलंकार मिरवतात माता-भगिनी,
थोर उपकार तुमचे, धन्य ती जिजाऊ जननी...!

सह्याद्री गर्जुनी सांगतो तुमची गाथा,
तुमच्या चरणांवरी सदा नमितो हा माथा...!

श्रीराम आणि श्रीकृष्ण तुमच्यातच पाहतो,
बारशालाच बाळाला आमच्या तुमचा पाळणा ऐकवितो...!

✍🏻 हिंदुराव गोळे

   https://hinduraogole.blogspot.com/
☝🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻 

🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼

Post a Comment

0 Comments