नवी भरारी
नव्या आत्मविश्वासाने भरारी घेऊ
आकाशालाही गवसणी घालू
सोडून सारी दुःख आणि निराशा
यशाच्या उज्ज्वल मार्गावर चालू
जात आमुची मरणाऱ्याची न् मारणाऱ्याची
वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्याची
आदर्श आम्हा श्री शिवशंभूछत्रपतींचा
ज्वलज्ज्वलनंतेजस पराक्रमाचा आणि त्यागाचा
साद घालितो सह्यगिरी आम्हांला
आठवा शिवरायांच्या पराक्रमाला
शिवप्रभूंची आण आम्हाला
गाजवू पराक्रम दाहीदिशाला
साथ आम्हा संतांच्या अमृतवचनांची
टाळ विणेच्या झणत्काराची
शौर्याची ती दाखवू जात
हातांमध्ये घालूनी हात
इतिहासाची चाळू पाने
शोधू आमुच्यात काय उणे
संकटांवर करुनी मात
विजयी होऊ रणांगणात
यश कीर्तीचे गाठू शिखर
नाव आपुले कोरु तयावर
© ✍🏻 हिंदुराव गोळे
कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments