Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शाळा

शाळा

आठवते मला माझी शाळा
पाटी पुस्तक दप्तर आणि फळा

गुरुजींनी शिकवलेली बाराखडी
तशीच आठवते त्यांची ती छडी

मित्रांसोबत शिकलो इथे आनंदाने
खेळलो रुसलो भांडलो फक्त प्रेमाने

आठवते आता ती सारी मस्ती
अभ्यासापेक्षा खोड्याच जास्ती

सोपी होती ती शाळेतील परीक्षा
रागाने दिलेली गुरुजींनी शिक्षा

गुरुजींच्या रागातही होती माया
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेमाची छाया

येतील का ते दिवस पुन्हा आनंदाचे
हसण्या खेळण्या बागडण्याचे

पुन्हा पुन्हा वाटते शाळेत जावे
पुन्हा पुन्हा वाटते लहान व्हावे

गुरुजींनी आपला हात धरावा
पाटीवरती श्रीगणेशा गिरवावा

जीवन शिक्षणाचे हे विद्यामंदिर
खरचं होते ते खूपच सुंदर

© ✍🏻 हिंदुराव गोळे

    कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
 

Post a Comment

0 Comments