Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

रुद्राचे तांडव | बलिदानाने ठरला तो युगंधर

रुद्राचे तांडव

शौर्याचा पराक्रमाचा अन् त्यागाचा रचिला मांडव
शंभूने मांडिले घोर रुद्राचे तांडव

पाच पातशाह्यांविरुद्ध तो लढला
धर्मवीर शंभूराजा वाघासम जगला

औरंग्याच्या सेनासागराला देऊनी टक्कर
परमप्रतापी शंभूने मांडिले युद्ध घनघोर

कवी मनाचा संस्कृत पंडित राजा हा थोर
यासम दुजा ना कोणी अजिंक्य वीर

शिवसिंहाचा छावा हा धुरंधर
बलिदानाने ठरला तो युगंधर

औरंग्याच्या छळापुढे वाकला न झुकला
पाहून शंभूचे तेज औरंग्याही गुडघ्यावर बसला

शंभूराजाच्या बलिदानाने रण इथे पेटले
गवताच्या पात्यालाही भाले की फुटले

मृत्यूवर विजय मिळवून मृत्यूंजय ठरले
ज्वलज्ज्वलनंतेजस संभाजी ध्वजरुप झाले

शंभूराजाच्या बलिदानाने महाराष्ट्र पेटून उठला
सत्तावीस वर्षे न थकता झुंजला

शंभूराजांच्या बलिदानाची अमर ही गाथा
धर्मवीर तुमच्या चरणांवरी नतमस्तक हा माथा
 
© ✍🏻 हिंदुराव गोळे
  
    कविता,पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

 

Post a Comment

0 Comments