Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

मना असे होईल का ?

मना असे होईल का ?

वाटते मनाला रायगडची माती व्हावे
भगवान शिवप्रभूंचे चरण पूजावे

कधी वाटते ढाल व्हावे
सुभेदार तानाजींवरचे वार झेलावे

वाटते कधी चिलखत व्हावे
पावनखिंडीत बाजीप्रभूंना बिलगावे

कधी वाटते गळसरी व्हावे
मुरारबाजींच्या गळ्यात पडावे

वाटते कधी पालखी व्हावे
शिवाजी काशिदांना घेऊन पळावे

कधी वाटते वारा व्हावे
प्रतापराव गुजरांना परत फिरवावे

 वाटते कधी जोडे व्हावे
शिवरायांच्या चरणी रुतावे

© ✍🏻 हिंदुराव गोळे

   या आधीचे लेख,पोवाडे, कविता वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला दिलेल्या लिंकवर अवश्य भेट द्या.🙏🏻

 

Post a Comment

0 Comments