वृक्षारोपण
ओसाड झालेत डोंगर आणि माळ
भीषण असेल येणारा पुढचा काळ
वृक्षारोपण करुया मिळून सारे रानोरानी
हिरवीगार करुया सारी धरणी
मेघ वर्षाव करतील घेऊन पाणी
पक्षीही गातील मग हर्षाने गाणी
वाटसरुला मिळेल शीतल छाया
गोड मधूर फळे मिळतील खावया
पाणीच पाणी होईल चोहीकडे
गर्द झाडीने दाटतील डोंगर न् कडे
धरणीमाय पिकवील अगणित मोती
धान्याची रास पडेल बळीराजाच्या हाती
निसर्गाचा राखला जाईल समतोल
निरामय आरोग्य लाभेल अनमोल
लावू नका कधी डोंगराला वणवा
आता हाच धडा प्रत्येकाने शिकावा
वृक्षारोपण करुन नटवूया निसर्ग
धरतीवर होईल त्याने नक्कीच स्वर्ग
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीचे लेख,कविता, पोवाडे वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला दिलेल्या लिंकवर अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments