जगणं आनंदाचं व्हावं !
हसत खेळत आयुष्य जगावं
आयुष्याकडे संधी म्हणून पहावं
कशाला हव्यात भूतकाळातील कटू आठवणी
व्यर्थ वेळ घालवू नये रात्र रात्र जागवूनी
संकटांना एक संधी म्हणून स्विकारावं
ठोकरुन संकटांना नव्यानं जगावं
कशाला उगाच काळजी चिंता भिती
आहे त्यात समाधान असावं चित्ती
भविष्याच्या चिंतेत वर्तमान नको जाया वाया
जगावं सोडून अनाठायी मोह माया
आलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं करावं
क्षण न् क्षण मनसोक्त जगून घ्यावं
जीवन गाणं आनंदाने गात राहवं
खरचं जगणं हे आनंदाचं व्हावं !
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीचे लेख,कविता, पोवाडे वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला खाली दिलेल्या लिंकवर अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments