Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा

वीर बाजीप्रभू देशपांडे






नमन  माझे पांडूरंगाला
आदिशक्ती तुळजाभवानीला
अभेपूरीच्या भैरवनाथाला
संभाजीराव भिडे गुरुजींच्या गुरु चरणाला
सावध होऊन ऐका पोवाड्याला
शिंद गावच्या पुण्यभूमीला जी...जी...जी....
थोर दांडपट्टा बहाद्दर 
मोठा पराक्रमी वीर
मर्द मावळा झुंझार
शत्रूंशी लढला घनघोर
बाजीप्रभू शिंद भूमी अवतरला
मनी आनंद मावळ्यात
जागले दिल्या वचनाला जी...जी...जी....
घनघोर करुनी संग्राम
लढला प्रभू राम
गाळिला रक्त आणि घाम
धाडिला शत्रू यमसदना
बहु त्या जखमा बाजीच्या वदना
मारिल्या शत्रू सैन्याच्या माना
सार्थ केले गजाखिंडी जीवना
गजापूरचीखिंड केली पावना
जी...जी...जी....
इंच इंच जखमा अंगाला
शत्रूंचा थरकाप झाला
पाहूनी रौद्र बाजीला
शत्रू पळती समयाला
जी...जी..जी...
असा बाजी शौर्याची खाण
मराठ्यांना तयाचा अभिमान
केली गजाखिंड पावन
शूर बाजी तयाला माझे नमन
जी....जी...जी...
जसा रामाचा हनुमान
बाजी शिवबाचा स्वाभिमान
स्वराज्यासाठी वेचिला प्राण
मिळविला बहू बहूमान
जी....जी...जी...
महाराष्ट्र शौर्याची खाण
बाजी प्रभू एक महा रत्न
गायिले आज गुणगान
सार्थक झाले माझे जीवन
जी....जी...जी...
बाजीप्रभूंचा असामान्य त्याग
मलाही लाभू दे असा कर्मयोग
तुळजापदाला मागतो मागणं
संभाजीराव भिडे गुरुजींचा मला आशिर्वाद
शौर्याचा गाईन इतिहास होऊनी धुंद
जी...जी...जी...
© हिंदुराव गोळे.
🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁


Post a Comment

0 Comments