Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

नातं

नातं

क्षुल्लक कारणानं तुटत असलेलं नातं
फारवेळ ताणूच नये जोडावे ते परत

आपलचं काही जर असेल चुकलं
तर माफी मागून व्हावं मोकळं

डोक्यावर नकोच नुसता भार
माफी मागायला नका करु उशीर फार

आपल्याच माणसाची माफी मागायला कसली आलीय लाज
उद्याचा दिवस चांगला यावा म्हणून माफी मागावी आज

समोरचा जर असेल चुकला तर
काय होतयं आपण माफ केलं तर

क्षणभंगुर आहे आयुष्य माणसाचं
कर्तव्य पार पाडू नातं जपण्याचं

माफी मागण्यानं कोणी होत नसतो लहान
उलट माफी मागणाराच असतो महान

तुटत असलेली नाती खुबीने जपावी
कुठल्याही नात्यात कधी दरीच नसावी

© हिंदुराव गोळे ✍🏻✍🏻✍🏻

ही आणि अशाच काही कविता, पोवाडे, कथा तसेच काही आठवणी वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला खालील लिंकवर जाऊन अवश्य भेट द्या.🙏🏻

 

🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁

Post a Comment

0 Comments