मैत्री
एकच गोळी तोंडातच फोडून
मित्राला देणं म्हणजे मैत्री
स्वतः उपाशी राहून मित्राला
जेऊ घालणं म्हणजे मैत्री
मित्र चुकत असेल तर अधिकारानं
त्याचा कान पकडणे म्हणजे मैत्री
मित्राच्या गैरहजेरीत त्याच्या घरच्यांना त्याची उणीव न होऊ देणं म्हणजे मैत्री
मित्राच्या आनंदात स्वतःचं दुःख
विसरुन आनंदी राहणं म्हणजे मैत्री
दुःखात मित्राची साथ कधीच
न सोडणं म्हणजे मैत्री
भांडण विसरुन मित्राला कडकडून मिठी मारणं म्हणजे मैत्री
स्वतः पेक्षा मित्रावर असलेल्या भरवशाची खात्री म्हणजे मैत्री
© हिंदुराव गोळे

0 Comments