Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

।। श्री शंभू छत्रपती ।।

।। श्री शंभू छत्रपती ।।
 
 
     *कपटी औरंग्याच्या अमानुष कौर्यापुढे धर्मासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी अति धिरोदात्तपणे आणि निश्चल ,असामान्य धैर्याने ,निर्भयणे मृत्यूवर विजय मिळवला आणि पुराणातील कर्णानंतर ते 'मृत्यूजंय' झाले. पाताळयंत्री औरंग्यापुढे झुकले नाहीत. होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी म्हणून दयेची याचना केली नाही उलट निर्भयतेने मृत्यूला सामोरे गेले.*
    *स्वतःला आलमगीर, शहेनशहा, पातशहा-ए-हिंदोस्थान आणि अशाच काही बिरुद्या लावणारा औरंग्या संभाजी महाराजांशी समोरासमोर लढाई करण्यात अपयशी ठरला.कपटाने त्यांना कैद करण्यात आले.हिंदवी स्वराज्याचा छत्रपती वेळ आल्यावर मृत्यूलाही जिंकतो हे चिरकाल सत्य धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी औरंग्याला आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी हसत हसत मृत्यू जवळ करणाऱ्या  धर्मवीरांनी शिकवले.*
     *अमानुष कौर्यापुढे असामान्य धैर्याचा विजय झाला. छत्रपती श्री संभाजी महाराजांची धैर्याची सीमा अति टोकाची अशीच होती.त्यांच्या या धैर्याचे अनेक पैलू समोर येतात.आगऱ्याला लहानपणी असताना औरंग्याचा मल्लयुद्धाचा प्रस्ताव ठोकरुन लावणारे बालसुलभ मनाचे निसर्गदत्त धैर्य, होणाऱ्या परिणामांचा विचार न करता अकबराला आश्रय दिला ते तारुण्यातील उद्दामपणाचे धैर्य, औरंग्याला स्वतःच्या मृत्यूपर्यंत टक्कर दिली ते वीराचे धैर्य आणि जीवनाच्या अंतिम क्षणी जे दाखवलं ते निश्चय हुतात्म्याचं धैर्य.*
 *शिवरायांस आठवावे । जीवित तृणवत् मानावे ।।*
*इहलोकी परलोकी उरावे । किर्तीरुपे ।।*
   *हा गुरुउपदेश चित्तांत ठेवून संभाजीमहाराजांनी आपला देह कःपदार्थ मानला.*
    *जीवावर बेतल्यावर भल्याभल्यांचा स्वाभिमान गळून पडतो याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळतात. पण संभाजीमहाराजांनी स्वतः ला असा डाग लावून घेतला नाही. अति स्वाभिमानी, धर्माभिमानी संभाजी महाराज औरंग्याला शरण गेले नाहीत, त्याच्यापुढे झुकले नाहीत, होणाऱ्या त्रासाला हसत हसत स्विकारलं,वेदनेचा पुसटसाही त्रास त्यांनी दाखवला नाही. औरंग्याच्या धर्मवेड्या प्रवृत्तीला त्यांचा देह बळी पडला.पण त्यांच्या बलिदानातून आणि होतात्म्यामुळे हिंदवी स्वराज्य, हिंदू धर्म या दोहोंचेही रक्षण झाले. राजानेच धर्म बदलला असता तर प्रजा धर्मांतरापासून वाचली नसतीच.१६८९ ला पापिस्थानाची निर्मिती झाली असती हे शाश्वत सत्य आहे.*
    *देव,देश,धर्मासाठी जगावं कसं हे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शिकवले तर  देव,देश,धर्मासाठी मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी शिकवले.*

*निश्चलाचा महामेरू । रयतेसी आधारु ।।*
*अघटित स्थितीतही निर्धारु । मृत्यूंजय धर्मवीर शंभूराय ।।*

    *आजही औरंग्याची प्रवृत्ती जिवंत आहे. दहशतवाद, बाँम्बस्फोट,पुलवामा हल्ला,२६/११ चा हल्ला, पुण्यातील बेकरीवरचा हल्ला अशा घटना या प्रवृत्तीचाच एक भाग आहे. हिंदुस्थान, हिंदुसमाज आणि हिंदूधर्म यांच्या रक्षणासाठी आम्हाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा आदर्श असायला हवा.त्यांच्या अंशरुपाने जरी आम्ही धर्मरक्षाणासाठी कामी आलो तरी मानवी जीवनाची इतिकर्तव्यता साध्य होईल.*
   
*धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ।*🙏🏻🚩

©  हिंदुराव गोळे

🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁
 

Post a Comment

0 Comments