महाराष्ट्र माझा
ज्ञानेशांची ओवी म्हणजे
महाराष्ट्र माझा....
तुकोबारायांची अभंगवाणी म्हणजे
महाराष्ट्र माझा....
समर्थ रामदासांचा राष्ट्रवाद म्हणजे
महाराष्ट्र माझा....
आषाढी कार्तिकी वारी म्हणजे
महाराष्ट्र माझा...
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे
महाराष्ट्र माझा.....
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे
महाराष्ट्र माझा....
अमृताचा गोडवा असणारी माय मराठी भाषा म्हणजे
महाराष्ट्र माझा....
शाहिरांची डफावरची थाप म्हणजे
महाराष्ट्र माझा....
उत्तुंग सह्यगिरीची रांग म्हणजे
महाराष्ट्र माझा....
कृष्णा कोयना गोदावरीचं खळाळतं पाणी म्हणजे
महाराष्ट्र माझा....
गडकोटांची अभेद्य तटबंदी म्हणजे
महाराष्ट्र माझा....
भक्तीगंगा शक्तीगंगा यांचा संगम म्हणजे
महाराष्ट्र माझा....
पोलादी मनगट पहाडी छाती म्हणजे
महाराष्ट्र माझा...
हर हर महादेव गर्जना म्हणजे
महाराष्ट्र माझा....
ज्ञानोबा तुकाराम गजर म्हणजे
महाराष्ट्र माझा....
स्वातंत्र्यवीर सावरकरांची उडी म्हणजे
महाराष्ट्र माझा....
नरकेसरी लो.टिळकांची प्रतिज्ञा म्हणजे
महाराष्ट्र माझा....
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुधारणा म्हणजे
महाराष्ट्र माझा....
महात्मा फुल्यांची क्रांतिज्योत म्हणजे
महाराष्ट्र माझा....
सावित्रीबाईंची शिक्षणगंगा म्हणजे
महाराष्ट्र माझा...
यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व म्हणजे
महाराष्ट्र माझा....
बोलपटाचा उगम म्हणजे
महाराष्ट्र माझा....
गदिमांचं गीतरामायण म्हणजे
महाराष्ट्र माझा...
कुसुमाग्रज मर्ढेकर आदिंचं काव्य म्हणजे
महाराष्ट्र माझा....
अत्रे,पु.लं.यांचा विनोद म्हणजे
महाराष्ट्र माझा....
बाळासाहेब ठाकरेंचं वक्तृत्व म्हणजे
महाराष्ट्र माझा....
लतादिदींचा स्वर म्हणजे
महाराष्ट्र माझा....
सचिन तेंडूलकरचे शतक म्हणजे
महाराष्ट्र माझा....
हिमालयाचा पाठिराखा म्हणजे
महाराष्ट्र माझा....
लोककलांचा अविष्कार म्हणजे
महाराष्ट्र माझा....
अनेक बोलीभाषांचा गोडवा म्हणजे
महाराष्ट्र माझा....
शूरवीरांचा साधूसंतांचा क्रांतिकारकांचा वारसा म्हणजे
महाराष्ट्र माझा....
कुस्त्यांचा फड म्हणजे
महाराष्ट्र माझा....
जय जय महाराष्ट्र माझा ...
गर्जा महाराष्ट्र माझा...
© ✍🏻 हिंदुराव गोळे
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩
यापूर्वीच्या कविता,पोवाडे, लेख वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments