*।। श्री शिवप्रभू प्रसन्न ।।*
*शिवरायांचे आठवावे रुप*
*मागील अपराध क्षमावे । कारभारी हाती धरावे ।*
*सुखी करून सोडावे । कामाकडे ।। ३ ।।*
राज्यकारणामध्ये पदाधिकाऱ्यांच्या काही चुका होत असतात, त्यांच्या अपराधामागे कोणती भूमिका होती ती पाहावी. हेतुतः घोर अपराध असेल तर इतरांना जरब बसण्यासाठी त्यांना कडक शासन देणे आवश्यकच आहे परंतु ज्यांचे अपराध सौम्य असतील ते क्षमायोग्य ठरवावेत.मनुष्य कधीतरी अनाहूतपणे चूक करतो. त्याला क्षमा करून सुधारण्याची संधी देणेही गरजेचे असते. तशी क्षमा करून त्याला आपलेसे करून घ्यावे. सर्व कारभाऱ्यांना विश्वासात घेऊन समाधानी ठेवावे. त्यांच्यावर यथायोग्य कामे सोपवून विश्वास टाकला तर ते कार्यप्रवण होतात ; आणि त्यांच्या पूर्ण ताकदीने,उत्साहाने व मुख्य म्हणजे निष्ठेने राज्याची कामे करीत राहतात.
असा मोलाचा सल्ला समर्थांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पत्रातून दिला.
( क्रमशः )
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 वरील लिंकवर आपल्या ब्लॉगला भेट द्यावी.🙏
*संकलन :- ह.भ.प.*
*हिंदुरावमहाराज गोळे*
*सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,*
*विश्व हिंदू परिषद, बजरंग दल*
*अध्यक्ष :- सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान महाराष्ट्र*
🙏🍁🙏🍁🙏🍁🙏🍁🙏

0 Comments