चला होळी पूजूया
दुःख भीती दारिद्रयाची होळी करुया
चला होळी पूजूया
राग लोभ मत्सराची होळी करुया
चला होळी पूजूया
संकटांची रोगांची अनारोग्याची होळी करुया
चला होळी पूजूया
द्वेषाची कपटाची वादाची होळी करुया
चला होळी पूजूया
निराशा कंटाळा आळसाची होळी करुया
चला होळी पूजूया
आतंकवाद दहशतवाद हिंसाचाराची होळी करुया
चला होळी पूजूया
प्रेमाची मायेची सुसंवादाची उधळण करुया
चला होळी पूजूया
© ✍🏻 हिंदुराव गोळे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !
कविता, पोवाडे, लेख आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments