Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शब्द

शब्द

शब्दांवर प्रेम केले की जे हाती गवसते
त्याची सुंदरशी रचना तयार होत असते

शब्दांशी थोडं खेळता आलं पाहिजे
शब्दांच्या वारुवर स्वैर होता आलं पाहिजे

शब्दांनीच रुसावं शब्दांनीच हसावं
शब्दांनीच गावं शब्दांसोबतच जगावं

शब्दांनी होतात न भरणारे घाव
म्हणूनच असावा शब्दांमध्ये प्रेमभाव

शब्दच असतात दुधारी तलवार
न कळत होऊ शकतात शब्दांनीच वार

शब्दच भांडवल शब्दच संपत्ती शब्दच धन
शब्दांनीच जपावे एकमेकांचे मन

शब्दांचीच फूलं आणि शब्दांचीच पूजा
शब्दांचाच असावा देव्हाऱ्यातील देव माझा

शब्दांनीच तुटतात नाती शब्दांनीच जुळते प्रीती
अनोखी आहे या शब्दांची महती

© ✍🏻 हिंदुराव गोळे
   
      कविता, पोवाडे, लेख आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.



Post a Comment

0 Comments