सवय
सवयीनं जगणं खरचं खूप सोपं असतं
सवयीच्या माणसांशिवाय जगणं अवघड असतं
आपल्यांसोबत जगणं सोपं असतं
पण त्यांच्याशिवाय जगणं अवघड असतं
सोबतीच्या क्षणांची आठवण होताना
मन उगाचाच दुःखी होत असतं
आनंद आणि दुःख एकत्र वाटताना
मन पिसासारखं हलकं होत असतं
सवयीच्या सवयीची सवयच नको
सवयीशिवाय मग जगणंच अवघड होतं
© ✍🏻 हिंदुराव गोळे
कविता, पोवाडे, लेख आणि माझ्या साठवणीतील काही आठवणी वाचण्यासाठी कृपया खु दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला नक्की भेट द्या.

0 Comments