वेळ
कुणाला देण्यासाठी हल्ली
वेळच नाही मिळत
खूप काही मिळवण्यासाठी
जो तो सतत आहे पळत
घड्याळाशी स्पर्धा करत
जो तो आहे धावत
जीवलगांच्या भेटीही आता
महिनोंमहिने नाहीत घडत
आयुष्य जगत असताना
काळ ठेवत आहे पाळत
होतात चुका नजरचुकीने
ज्याच्या त्याच्या नकळत
पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा
आयुष्याचा ग्रंथ बसावा चाळत
नुसत्याच घाईगडबडीत या
नक्कीच काही तरी आहे चुकत
© ✍🏻 हिंदुराव गोळे
ही आणि अशाच काही कविता, पोवाडे, काही लेख आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला खालील लिंकवर जाऊन अवश्य भेट द्या.

0 Comments