असा एक मित्र
ज्याच्यावर हक्कानं आपण रुसावं
असा एक आपला लाडका मित्र असावा
न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारा
असा एक मनकवडा मित्र असावा
चुकलो तर आपला कान धरणारा
असा एक अधिकारी मित्र असावा
आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः झटणारा
असा एक झोकून देणारा मित्र असावा
सुखापेक्षा दुःखात आपली सोबत करणारा
असा एक काळजीवाहू मित्र असावा
आपल्या घरच्यासांठी जणू आपलं दुसरं रुप वाटणारा
असा एक आपलं प्रतिबिंब असणारा मित्र असावा
आपल्याला वेदना होताच त्याच्या डोळ्यात पाणी येणारा
असा एक कनवाळू मित्र असावा
आपल्या वरचा वार परतवून लावणारा
असा एक संकटमोचन मित्र असावा
© ✍🏻 हिंदुराव गोळे
ही आणि अशाच काही कविता, पोवाडे, लेख आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments