कविता
शब्दांमधून जेव्हा भावना व्यक्त
होतात तेव्हा होते ती कविता
सहज सुचलं कागदावर उतरवलं
चालता बोलता सुचते ती कविता
हलकं फुलकं काव्य बांधताना
शब्दांना नवे रुप येते ती कविता
कधी आनंदाची तर कधी दुःखाची
सुख दुःखाची झालर लावून येते ती कविता
शब्दांनीच शब्दांशी खेळलेला
लाडिक खेळ म्हणजे कविता
कविकल्पनेतून अशक्यप्राय गोष्टी
शब्दांतून शक्य होतात ती कविता
शब्दांचेच वार शब्दांचीच फुले
आनंदाचं गाणं म्हणजे कविता
सर्जनशील मनाच्या गाभाऱ्यातून
नवोन्मेष प्रकटतो ती कविता
काही केल्या थांबत नाहीत अशा
साहित्याच्या प्रसववेदना म्हणजे कविता
© ✍🏻 हिंदुराव गोळे
जागतिक कविता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
ही आणि अशाच काही कविता, पोवाडे, लेख तसेच माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी कृपया आपल्या ब्लॉगला खालील लिंकवर जाऊन अवश्य भेट द्या .

0 Comments