गड्या आपला गाव बरा
गड्या आपला गावच बरा
हृदयांतून इथल्या वाहतो मायेचा झरा
शहरात रोजच्याच भाणगडी सतरा
गावातला माझा कौलारू वाडाच बरा
गावात स्वच्छ सुंदर निसर्गाचा ठेवा
शहरात मिळतही नाही शुद्ध हवा
आंबे फणस गावात आहे रानमेवा
शहरातील फळांचा गोडवा कुणाला हवा
ऐकू येतो गावात कोकिळेचा सूर
शहरात सारा प्रदुषणाचाच धूर
आठवण येता गावाची मनात येते काहूर
डोळ्यांतून वाहतो मग आसवांचा पूर
आईच्या हाताला चवच आहे भारी
अमृताहूनी गोड लागते भाजी भाकरी
गावाची गड्या माझ्या बातच न्यारी
हसती खेळती आनंदी माणसं सारी
कोंबड्याच्या आरवण्याने होते पहाट
गजबजून जातो मंदिराचा घाट
गावाचा आहे माझ्या न्याराच थाट
हिरवागार सारा नदीचा काठ
✍🏻 © हिंदुराव गोळे
अशाच कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.


0 Comments