उन्हाळ्यातील पाऊस
येईल येईल वाटतो पण नुसतीच देतो हूल
पाऊस सुरू होईल त्याची लागतेय चाहूल
वाराही थांबलाय आणि ढग जमू लागलेत
पिल्लांसह पक्षी घरट्याकडे जाऊ लागलेत
वासरासाठी धावत येईल गोठ्यातील गाय
लेकराला कुशीत घेईल घरातील माय
नाही नाही म्हणता पाऊस जोरात सुरू झालाय
वीजांच्या गडगडाटासह कडकडू लागलाय
टपोऱ्या गारा पडू लागलेत अंगणात
वेचताना त्या चिमुकल्यांचा आनंद मावेना गगणात
पडून गेला पाऊस धरणी झाली ओलीचिंब
उन्हाळ्याच्या काहिलीवर शीतल शिडकावा एक एक थेंब
© ✍🏻 हिंदुराव गोळे
अशाच काही कविता, पोवाडे आणि साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments