महाराज पुन्हा जन्माला या !
महाराज खरचं तुम्हा विना
महाराष्ट्र आज आहे सुना
शिवराय तुमच्या शिवाय
नाही आम्हास तरणोपाय
महाराज पुन्हा या जन्माला
घडवण्या नव महाराष्ट्राला
संपवण्या दहशतवादाला
नष्ट करण्या भ्रष्टाचाराला
महाराज तुमची आहे गरज आज
सत्ताधाऱ्यांना चढलाय येथे माज
तुमच्या कार्याचा अलौकिक बाज
तुम्हीच करु शकाल हे काज
तुमच्या राज्यात सुखी होती प्रजा
कारण काळजी घेणारा होता राजा
असा होता कनवाळू देव माझा
कलियुगी पुन्हा अवतरला प्रभूरामराजा
तुमचे ते थोर आचार विचार
प्रजाहिताचं स्वप्न झाले साकार
सत्तापिपासूंवर करण्या प्रहार
तुमच्याच धोरणांचा आम्हा आधार
शिवप्रभू तुम्ही केले दुष्टांना ठार
तुम्हीच आहात आमचे तारणहार
तुमच्या कार्याची महती अपरंपार
आम्हाला मिळावी यातून शक्ती अपार
तुम्हीच आहात आमची प्रेरणा
आणि तुम्हीच आमची धारणा
तारावया आम्हा सकळजना
महाराज पुन्हा या भाकतो आम्ही करुणा
तुमचं राज्य होतं लोककल्याणाचं
आजचं राजकारण फक्त खिसे भरण्याचं
किती दिवस आता हे सहन करायचं
साकडं घालतो तुम्हा पुन्हा जन्माला येण्याचं
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता,पोवाडे,कथा वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments