Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

सौभाग्यवती

सौभाग्यवती

पत्नी तर आहेसच पण कधी मैत्रीण झालीस तू
माझ्या मनातील सर्व ओळखतेस तू

मैत्रीण सोबतच कधी माझी आईही झालीस तू
माझ्या आजारपणात मला जपलेस तू

आईसोबतच कधी बहीणही झालीस तू
माझ्या घरातील सर्वांना एका धाग्यात बांधलेस तू

बहीणीसोबतच कधी माझी मुलगीही झालीस तू
माझ्यावर जीवापाड प्रेम केलेस तू

माझ्यासाठी केवळ माझी पत्नी नाहीस तू
माझ्याशी प्रत्येक नाते जोडलेस तू

माझ्या हट्टी काहीशा तापट स्वभावाला आळवलेस तू
माझ्यासाठी तुझ्या इच्छा हट्ट यांना मुरड घातलीस तू

जन्मोजन्मी मला पत्नी म्हणून हवी आहेस तू
माझ्यासाठी एवढे करशीलच ना तू

©  ✍🏻  हिंदुराव गोळे

   प्रिय पत्नी माला हीस वाढदिवसानिमित्त  सस्नेह सादर.

आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🌸🙏🏻🌹🌸🙏🏻🌹🌸

Post a Comment

0 Comments