Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

कृष्णामाई

कृष्णामाई

निळाशार पाण्याचा साठा स्वच्छ आणि निर्मळ
चोहोबाजूंनी आच्छादलेली डोंगरावरची हिरवळ

एक एक लाट येऊन काठावर धडकते
पाहताना तो जलप्रवाह मन आनंदी होते

कृष्णामाईच्या पाण्याचा हा पवित्र जलस्त्रोत
जातो काठावरच्या गावांची शेती पिकवित

पाण्यामध्ये निवांत जो उभा राहिला
शितलतेचा आनंद मिळतो त्याच्या तनामनाला

पिण्यासाठी पाणी मिळते फुलतो शेतमळा
उपकार कृष्णामाईचे आठवून पाणी येते डोळा

श्रीकृष्णाचं जलरुप कृष्णामाई
चरणांवरी तीच्या नतमस्तक डोई

© ✍🏻 हिंदुराव गोळे

    कृपया आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
 

 

Post a Comment

0 Comments