निसर्गसंवर्धन
देवाच्या काठीला म्हणतात आवाज नसतो
पण फटका मात्र तीचा वर्मीच बसतो
निसर्गाचा ऱ्हास करण्या मानव पुढे आहे सरसावला
निसर्गच पहा आता मानवावर आहे कोपला
झाडे तोडून वणवे लावून करतोय सर्वनाश
स्वतःच्याच अंतासाठी मानव तयार करतोय पाश
सरपणासाठीही मिळणार नाहीत एक दिवस लाकडं
शुद्ध हवा पाण्यासाठी उभं राहिल भयंकर कोडं
झाडे लावा झाडे जगवा नका लावू वणवा
इकडे तिकडे चोहीकडे होऊ द्या निसर्ग हिरवा
नाहीतर शुद्ध हवा पाण्यासाठी मानव पुढे तरसणार
आभाळातील ढगही पाणी नाहीत बरसणार
निसर्ग संवर्धन गरज आहे पहा काळाजी
भविष्यातील मानवाच्या निरोगी आरोग्याची
वेळीच सावध होऊन शिका नवा धडा
निसर्ग संवर्धनासाठी आतापासून लढा लढा
© ✍🏻 हिंदुराव गोळे

0 Comments