Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आत्महत्या

आत्महत्या

आत्महत्या करणं हे एक पाप आहे
ती करणाऱ्याला देवही कधी करणार नाही माफ

का ? आणि कशासाठी ? आत्महत्या करायची
क्षुल्लक कारणासाठी स्वतःची जीवनयात्रा का संपवायची

कितीही मोठं संकट आलं तरी आभाळ कोसळत नाही
आत्महत्या करणं हा काही पर्याय होत नाही

संकटांवर मात करून नव्यानं उभं राहयचं
स्वतःच स्वतःवर असं नाही कधी रुसायचं

आत्महत्या करणारा आत्महत्या करुन जातो
पण त्याच्या पश्चात त्याचा परिवार उन्मळून पडतो

म्हणून आत्महत्या करण्याचा विचार कधीच करायचा नाही
परिवाराला आपल्या दुःखाच्या दरीत नाही ढकलायचं

लेकरांच्या चेहऱ्यावरचं हसू हिरवायचं नाही
आत्महत्येचं पाऊल कधीच उचलायचं नाही

उठा लढा पडा परत उठून लढा
पण आत्महत्या करुन संपवू नका जीवनगाडा

प्रयत्न केल्यावर यश नक्कीच मिळतं
प्रत्येक समस्येचं कोडं नक्कीच उलगडतं

जीवन जगावे आनंदाने आत्महत्या का करायची
चला स्वतः च स्वतःची नवी दुनिया उभी करायची

अनमोल आहे मानवी जीवन आनंदाने जगायचे
अनमोल जीवनाला अर्ध्यावरच का संपवायचे

© ✍🏻 हिंदुराव गोळे

   यापूर्वीच्या कविता,पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🍁🙏🏻🌹🍁🙏🏻🌹🍁

Post a Comment

0 Comments