आयुष्य
आयुष्यात अशी स्वप्ने पहावीत
जी वास्तवास धरून असावीत
गुलाबाला स्पर्श करत असताना
सांभाळून राहवं काट्यांना
संकटांशी निकराने लढताना
उरांत असावा खंबीरपणा
शेर असलेल्या शत्रूशी लढताना
आपणही सव्वाशेर व्हावं भिडताना
घट्ट करुन आपलं मन
उभारायचं उध्वस्त झालेलं आपलं जीवन
दुसऱ्यांच्या वेदना ओळखायच्या असतात
त्यांच्या वेदनांवर फुंकर मारायच्या असतात
जीवाभावाची मैत्री नातं मनापासून जपायचं
खालेल्या मीठाला असतं जागायचं
आयुष्य हे आनंदाने जगायचं असतं
सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागायचं असतं
दुःखातही जगायचं सुखासाठी
सुखातही दुःख सामावण्यासाठी
दुःखा मागून सुख येतच असतं
त्यासाठी संयमी राहायचं असतं
अपयश पुसण्यासाठी यशस्वी भरारी घ्यावी
आयुष्याची कोडी धीराने सोडवावी
दुसऱ्यांच्या सुखात आपण सुखी व्हावं
त्यांच्या दुःखात मात्र आपलं दुःख विसरावं
आई वडीलांच्या डोळ्यात फक्त आनंदाश्रूच यावेत
जीवापल्याड त्यांना जपावेत
भावा बहीणींना समर्थ साथ द्यावी
प्रेमाने सारी नाती जपावी
आयुष्यात चांगले नाव कमवायचं
आपल्या पश्चात कीर्ती रुपे उरायचं
आयुष्य हे असंच जगायचं असतं
इथे मिळवलेलं सर्व सोडून जायचं असतं
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments