गडकोट
छातीचा आपल्या करुन कोट
मावळ्यांनी राखलेत आपले गडकोट
धारातीर्थं आहेत ती आमच्यासाठी
योगदान आहे त्यांचं तीर्थक्षेत्रं जपण्यासाठी
त्या दगडधोंड्यात आहे आमुचा इतिहास
त्यांचं पावित्र्यं आहे म्हणूनच खास
तट बुरुज आणि ताशीव कडे
उत्तुंग अभेद्य सह्यगिरीचे दर्शन घडे
पहाडी छाती आणि लढाऊबाणा
आहेत कित्येक इतिहासाच्या पाऊलखुणा
राकट गगनचुंबी दुर्गांचा तो बेलागपणा
अनुभव येतो पायी चढताना
मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेत ते
शक्तीपीठंच आहेत चालते बोलते
शिवप्रभूंच्या चरणधुळीचा गंध आहे
आजही त्यांचा अदृश्यरुपाने तेथे वास आहे
गडकोट आहेत आमची प्रेरणा
तीर्थस्थानचं ती अशी आमची धारणा
पावित्र्यं राखलं जावं गडकोटांचं
लाखमोलाच्या जाज्वल्य इतिहासाचं
✍🏻 © हिंदुराव गोळे
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments