कवीचं मन
फारच हळवं असतं कवीचं मन
शब्दांना शोधत असतं ते प्रत्येक क्षण
जेव्हा त्याच्या मनात उठतात तरंग
फुलकित होतं त्याचं अंग न् अंग
शब्दांशी खेळताना नवा अविष्कार घडवितो
भावनांना त्याच्या तो शब्दांतच मांडतो
दगडा मातीलाही पाहून त्याला काव्य सुचतं
सौंदर्य पाहून भोवतीचं मन त्याचं नाचतं
शब्दच असतात त्याची खरी संपत्ती
तेच त्याच्यासाठी हिरे माणिक मोती
कवीकल्पनांना नसतात काही मर्यादा
आनंदी असल्यावर सुचतात ओळी अनेकदा
असं म्हणतात जे ना पाहे रवी ते पाहे कवी
त्याच्या अविष्काराला खरचं दाद द्यायला हवी
शब्दांत त्याच्या फुलांचा नाजूकपणा असतो जसा
शस्त्रांचा धारदारपणाही असतो तसा
शब्दांनी त्याच्या तो क्रांतीही घडवितो
शब्दांनीच त्याच्या युद्धही जिंकतो
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments