Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

झाडे लावा झाडे जगवा

झाडे लावा झाडे जगवा

झाडे लावा झाडे जगवा मंत्र हा नवा
प्रत्येकाने जगण्यासाठी सातत्याने जपावा

मिळण्यासाठी पाणी आणि स्वच्छ हवा
पर्यावरणाचा समतोल जपायला हवा

पक्षी प्राणी वृक्ष आहेत निसर्गाचे प्राण
मनापासून केले पाहिजे त्यांचे रक्षण

वृक्ष तोड थांबवा थांबवा लावणे वणवा
नाहीतर मानवी आरोग्याची होईल वाणवा

निरामय आरोग्यासाठी मंत्र हा जपावा
झाडे लावा झाडे जगवा पाणी आडवा पाणी जिरवा

© ✍🏻 हिंदुराव गोळे
 
       खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🌳🌴☘️🌿🙏🏻🌿☘️🌴🌳

Post a Comment

0 Comments