Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

सांजवेळ

सांजवेळ

सूर्य नारायण पश्चिमेला ढळून गेलेला
केशरी रंग पसरला चोहीकडे मावळतीला

आकाशाने केशरी साज ल्याला
पहा रुप नवे आले मावळतीला

सांजवेळ झाली सूर्य गेला अस्ताला
आकाशातील रंग छटा पाहून मनी आनंद झाला

क्षितिजावर झाली उधळण केशरी रंगाची
हौस पुरी न होई मनमोहक दृश्य पाहणाऱ्याची

आता गायी येतील गोठ्यात पाखरे जातील घरट्यात
सुवासिनी भक्तिभावाने लावतील देवापुढे सांजवात

सांजवेळ होताना मनी काहूर उठते
सूर्योदयाच्या प्रभेची मन आतुरतेने वाट पहाते

© ✍🏻  हिंदुराव गोळे
 
     कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🍁🌞🍁🙏🏻🍁🌞🍁🙏🏻

Post a Comment

0 Comments