Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

लक्ष्मण

लक्ष्मण

लक्ष्मणा नाही आठवली का तुला उर्मिला
जीला अयोद्धेत सोडून तू वनवासात आला

बंधूप्रेमाचा तू भुकेला सदोदित
श्रीरामानेही केला तुझा सन्मान यथोचित

तु आखलेली ती प्रसिद्ध लक्ष्मणरेखा
रावणही भयभीत झाला प्रसंग त्यावर बाका

रामजानकीच्या वाटेतील काटेकुटे तु काढलेस
श्रीरामजानकीचे चरण तु सदैव पुजलेस

श्रीरामापेक्षाही खडतर वनवास तु भोगलास
बंधुप्रेमाचा सर्वोच्च दाखला तु ठरलास

इंद्रजीताच्या बाणाने मूर्च्छित तु झालास
रामाच्या काळजाचा ठोका तु चुकविलास

श्रीरामाच्या आधी शरयूमध्ये जल समाधिस्त झालास
बंधू वचनासाठी प्राण स्वतःचा त्यागलास

तुझ्या बंधूप्रेमाची जगीं अमर कीर्ती
शेषाचा अवतार तु अलौकिक तुझी ख्याती

© ✍🏻 हिंदुराव गोळे

    खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🌸🍁🙏🏻🌹🌸🍁🙏🏻

Post a Comment

0 Comments