वेडं मन
वेडं मन उगाचच खोड्या करत असतं
आता इथं असतं तर क्षणात दूर जातं
भूतकाळातील आठवणी जाग्या करतं
उगाचच नको त्या उलथापालथी करतं
कधी कधी नको त्या गोष्टी आठवून
क्षणांत त्या आठवणीत जातं हरवून
काही सुखद तर कधी दुःखद क्षणांना
हसून तर कधी रडून मोकळं करतं भावनांना
भविष्याची काळजी करुन ते थकून जातं
कितीही आवरलं तरी वेडं मन मोकाट सुटतं
कितीही समजावलं याला तरीही
एका जाग्यावर ते नसतंच कधीही
चिंता काळजीचं ओझं वहात असतं
वर्तमानात ते कमीच जगत असतं
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता, पोवाडे, लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments