पेरणी
पाऊस पडून गेलाय नुकता
पेरणीला सुरुवात होईल आता
थोडा निवांत असलेला शेतकरी
जाईल कामाला आता शेतावरी
बी बियाण्यांची होईल बैजवारी
पेरणीची लगबग होईल सारी
राखेत जपून ठेवलेला बी बिवळा
साफ करुन ठेवला जाईल सगळा
घात पडल्यावर सुरू होतील पाभारी
सर्जा राजाची बैलजोड सोबतीला खिल्लारी
धान्याचा दाणा सामावेल धरणीमातेच्या पोटामंधी
आनंद होईल शेतकऱ्याच्या मनामंधी
पोटच्या पोरावानी पिकाला जपलं जाईल
खुरपणी करुन तण काढलं जाईल
धान्याच्या रासीचं मनी असेल स्वप्न
काळी आई देईल हाती अपरिमित धन
देईल धरणीमाता अगणित मोती
रास धान्याची भरुन जाईल किती
© ✍🏻 हिंदुराव गोळे
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments