Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

असं कसं ?

असं कसं ?

अहंकाराचा वारा न लागो असं आम्ही फक्त म्हणत असतो
पण अहंकाराशिवाय आम्ही जगतच नसतो

भेदाभेद भ्रम अमंगळ फक्त बोलण्यापुरता असतो
पण प्रत्यक्षात तुझं माझं केल्याशिवाय राहत नसतो

मैत्र जीवांचे घडो नुसतं बोलायचं
पण त्याच मित्राला कोलत राहयचं

एकमेका सहाय्य करु फक्त सुविचार उरलाय
पण कसं कुणाला आपटायचं याचा बेत ठरलाय

दुसऱ्याचा सुखाचा स्वर फक्त आळवायाचा
पण त्याच्या वाटेत मात्र दुःखाचा खड्डा खणायचा

संतवचनं भाषणं चांगली व्हावी म्हणून वापरतात
प्रत्यक्षात मात्र ती हेतुपुरस्सर विसरतात

किती वागतायत फक्त वरपांगी माणसं
कधी कळणार आम्हाला सन्मार्गानं वागायचं कसं

विचारु सारं हे डोळे झाकून स्वतःच्या मनाला
रुचेल का हे असलं वागणं त्या विधात्याला

किती दिवस स्वतःच स्वतःला फसवायचं
किती दिवस असं खोटं खोटं वागायचं

नकोत नुसते सुविचार फक्त बोलण्यापुरते
ते प्रत्यक्षात अंगिकारले तरच आयुष्य घडते

© ✍🏻 हिंदुराव गोळे

   आपल्या ब्लॉगला खालील लिंकवर अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🍁🌻🙏🏻🌹🍁🌻🙏🏻

Post a Comment

0 Comments