ऐक ना रायगडा
सांगशील का रे बा रायगडा
कसा होता माझा श्रीशिवाजीराजा
सुखी होती रयत सारी
त्याच्या राज्यात होती आनंदी प्रजा
पाहिलास ना रे तू राज्याभिषेकसोहळा
एक एक मावळा झाला होता गोळा
रामराज्यच अवतरले होते पुन्हा
स्वर्गीचाच तो सुखसोहळा
हिंदूपतपादशाहीचं सुवर्ण सिंहासन पाहिलयं तू
कोंदडधारी राजाला त्यावर विराजमान होताना पाहिलय तू
दैदिप्यमान इतिहासाचा साक्षीदार आहेस तू
सांगशील का रे तुझ्या नजरेतुन तो सारा इतिहास तू
नशीबवान आहेस रे तू
आऊसाहेबांचा स्वप्न साकारताना पाहिलयं तू
शंभूराजांना अंगावर खेळवलयं तू
न्याय नीती धर्माचं राज्य पाहिलयं तू
विनवितो मी पुन्हा पुन्हा तुला
घडव दर्शन माझ्या राजाचं एकदा मला
साठवून ठेवीन हृदयांत माझ्या देवाला
रायगडा विसरणार नाही मी कधीच तूला
@ ✍🏻 हिंदुराव गोळे
अशाच काही कविता, पोवाडे, लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments