राजमाता
आऊसाहेब तुमच्यामुळेच टिकली गोठ्यातील गाय
मंदिरावरचे कळस आणि अंगणातील तुळस अन् घरातील माय
तुमच्या चरणांची धूळ करंड्यात भरावी
आणि कुंकूमतिलक म्हणून कपाळी लावावी
तुम्हीच काली तुम्हीच दुर्गा तुम्हीच भवानीमाता
नतमस्तक होतो तुमच्या चरणांवरी माथा
तुम्हीच तर होता स्वराज्याची प्रेरणा
आणि तुम्हीच शिकवला लढाऊबाणा
आऊसाहेब तुम्ही देव्हाऱ्यातील समईची ज्योती
तुमच्या संस्काराने घडले महाराष्ट्रात दोन छत्रपती
शिवराय जन्माला येण्यासाठी आऊसाहेब पाहिजेत
महाराष्ट्राची प्रत्येक माता जिजाऊ पाहिजेत
© ✍🏻 हिंदुराव गोळे
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🌹🍁🌺🌸🌹🍁🌺🙏🏻
फोटो सौजन्य :- विश्व हिंदू परिषद प्रसार प्रचार विभाग

0 Comments