Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिवरायांची समशेर तळपली पा

शिवरायांची समशेर तळपली पाहिजे

शिवबाच्या मर्द मावळ्या
तुझे रक्त सळसळले पाहिजे
पुन्हा एकदा शिवरायांची समशेर तळपली पाहिजे....

सईच्या पतीचे उपकार थोर
जागवला आमच्या मनगटातील जोर
पेटव तुझ्यातील ती शिवअंगार
तय्यार हो वर्मी करण्यास वार
वार तुझा फुका गेला नाही पाहिजे
पुन्हा एकदा शिवरायांची समशेर तळपली पाहिजे....

अरे काळीज तुझं रे वाघावानी
अन् शौर्य तुझं भीमार्जुनावानी
छाती तुझी रे पहाडावानी
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातुनी शब्द पडती कानी
मर्द मावळ्यांची एकजूट झाली पाहिजे
पुन्हा एकदा शिवरायांची समशेर तळपली पाहिजे.....

जात तुझी रे मराठ्याची 
मारणाऱ्याची आणि मरणाऱ्याची
बारा मावळच्या वाघरांची
वाघाचेही दात मोजणाऱ्याची
कीर्ती तुझी रे जगी उरली पाहिजे
पुन्हा एकदा शिवरायांची समशेर तळपली पाहिजे.....

शिवभक्तीचा मांडून रे जागर
चढव घोड्याच्या पाठीवर खोगीर
अभिमानाने आता तुझा भरलाय बघ ऊर
पाठीला लावूनी ढाल कमरेला रे तलवार
पेटलेला अंगार तुझा रे ज्वालामुखी झाला पाहिजे
पुन्हा एकदा शिवरायांची समशेर तळपली पाहिजे ....


 

✍️©  हिंदुराव गोळे

अध्यक्ष :- सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान महाराष्ट्र.
 (पायदळ एक वादळ )
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 वरील लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला अवश्य  भेट द्या.

🙏🏻🍁🚩🙏🏻🍁🚩🙏🏻🚩🍁

Post a Comment

0 Comments