*मी वारकरी मी धारकरी*
विठुरायाचा भक्त मी वारकरी
शिवरायांचा भक्त मी धारकरी
पंढरीची वारी करतो मी वारकरी
वढू रायरीची मोहीम करतो मी धारकरी
आषाढी वारी माझी मी वारकरी
शिलांगणाचं सोनं लुटतो मी धारकरी
विठुरायाच्या भक्तीगंगेत न्हातो मी वारकरी
शिवरायांच्या शक्तीने प्रेरीत होतो मी धारकरी
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भक्तीगंगा शक्तीगंगा मिळूनी वाहिल्या
म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्वप्न पूर्ण होताना अनेक नजरांनी पाहिल्या
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल गर्जतो मी वारकरी
हर हर महादेवची ललकारी माझी मी धारकरी
भगव्या पताकेसह वारी करतो मी वारकरी
भगव्या पताकेसह मोहीम करतो मी धारकरी
विठोबाचा वारकरी अन् शिवबाचा धारकरी
शरीरं दोन जरी पण आत्मा एकच परी
मी वारकरी मी धारकरी
मी धारकरी मी वारकरी
*✍️© लेखन:- हिंदुराव गोळे*
या आणि अशाच काही कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला खाली दिलेल्या लिंकवर अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments