पण'ती'ला जपताना
कदाचित वाऱ्याने ती नाही विझायची
पण एखाद्या भयानक वासनेमुळे ती विझायची
द्या मनगटात बळ तीच्या असं
एखाद्या विरांगणीच्या असतं जसं
आदर्श द्या तीला जगण्याचा असा
राजमाता जिजाऊंचा आणि राणी लक्ष्मीबाईंचा जसा
जिजाऊंची लेक वाघीण जशी
तोडेल ती नराधमाची बत्तीशी
संस्कार आपले शिकवा तीला
रुढी परंपरा सण जोडीला
धर्मवीर शंभूराजांचा इतिहास सांगा तीला
वाकडं पाऊल टाकण्याचं भय वाटेल तीला
काळजीने हळूवार जपा पणती
होऊ नये लांडग्याची शिकार ती
मनी ठेवा सगळ्यांनी एकच वसा
पणतीला जपण्याचा घ्या वसा
रक्ताची नात्याची नसेलही ती जरी
धर्माची बहीण आपल्यावरच आहे तीची जबाबदारी
✍️© हिंदुराव गोळे
या आणि अशाच कविता, पोवाडे आणि लेखांसाठी आपल्या ब्लॉगला खाली दिलेल्या लिंकवर अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻

0 Comments